• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

आळंदी व पंढरपूर येथे नवीन पादुकांचे विधिवत पूजन; २४ नोव्हेंबर रोजी जर्मनीकडे होणार प्रस्थान

यावल | प्रतिनिधी :

वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे आध्यात्मिक विचार आता जर्मनी देशातही अधिक व्यापक स्वरूपात पोहोचणार आहेत. जर्मनीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नवीन पादुकांची स्थापना करण्यात येणार असून, तेथील भारतीय तसेच वारकरी भाविकांना या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार आयोजित विविध धार्मिक उत्सवांमध्ये या पादुका पूजनासाठी तसेच पालखी सोहळ्यात विराजमान होणार आहेत. जर्मनीत वास्तव्यास असलेले फैजपूर येथील विक्रांत नरेंद्र नारखेडे यांनी ही माहिती दिली.

RelatedPosts

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

या नवीन पादुकांचे श्रीक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन करण्यात आले. या पूजनाचे आयोजन डिंगंबर महाराज मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे आणि वारकरी महामंडळाचे नरहरी महाराज चौधरी यांनी केले होते. यावेळी माऊली मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील आणि चैतन्य महाराज लोंढे उपस्थित होते.

त्यानंतर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेऊन पादुकांचे पूजन करण्यात आले. पूज्य प्रसाद महाराज अमलनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक विधी पार पडला. विक्रांत नरेंद्र नारखेडे, सौ. प्रज्ञा नारखेडे आणि नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते पुरोहितांच्या माध्यमातून विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला.

यानंतर डिंगंबर महाराज मठ, पंढरपूर येथे पादुकांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी पादुकांचे दर्शन घेऊन भक्तिभाव व्यक्त केला. या प्रसंगी पंढरीनाथ आरु, वासुदेव महाराज पाटील, घनश्याम पाटील, किशोर बोरॉले, विठ्ठल भंगाळे, विजय महाजन, रोझोदेकर, टेनू फेगडे, हरीश अत्तरडे, अतुल तळले, धनंजय फिरके, हर्षद महाजन, किरण ओंकार चौधरी, शीतल महाजन, मुकुंद भंगाळे, मयूर नारखेडे आणि पुष्कर नारखेडे यांच्यासह अनेक वारकरी व भाविक उपस्थित होते.

जर्मनीमध्ये वारकरी संप्रदायाचे विविध उत्सव, पालखी सोहळे तसेच वर्षभर हिंदू धर्मातील सण-उत्सव नियमितपणे आयोजित केले जातात. या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनात फैजपूर येथील आणि सध्या जर्मनीत वास्तव्यास असलेले विक्रांत नरेंद्र नारखेडे यांचा प्रमुख पुढाकार असतो. परदेशात राहूनही महाराष्ट्राची संतपरंपरा, वारकरी विचारधारा आणि भारतीय धार्मिक संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

याच धार्मिक भावनेतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका जर्मनीत स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या २४ नोव्हेंबर रोजी या नवीन पादुका जर्मनीकडे मार्गस्थ होणार असून, विक्रांत नारखेडे हे स्वतः त्यांच्यासोबत प्रवास करणार आहेत.

Ad 1
Tags: Nitin Koli
Previous Post

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

Related Posts

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

November 23, 2026
10
विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
ताज्या घडामोडी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 23, 2026
10
जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

November 23, 2026
14
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा
ताज्या घडामोडी

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

November 22, 2026
6
शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026
3
पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी
ताज्या घडामोडी

पारंपरिक वाद्य वाजविल्यासच मिरवणुकांना परवानगी

November 22, 2026
29

ताज्या बातम्या

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

November 23, 2026
सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

November 23, 2026
विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In