• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

तेलाचा मोठा साठा आणि ज्वलनशील साहित्यामुळे आगीने घेतले रौद्ररूप; सहा अग्निशमन केंद्रांच्या गाड्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न

नवी मुंबई | प्रतिनिधी :

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १८ परिसरात मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला रविवारी रात्री भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणावर तेलाचा साठा आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या उंचच उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट दूरवरून दिसत होते. त्यातच मधूनच स्फोटांचे मोठे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

RelatedPosts

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

सानपाडा सेक्टर १८ मधील प्लॉट क्रमांक ३८ येथे मॅफ्को मार्केटच्या मागे ही कंपनी आहे. संपूर्ण परिसर औद्योगिक कंपन्या आणि गोदामांनी वेढलेला असल्याने आग आणखी पसरल्यास शेजारील आस्थापनांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आग लागल्यानंतर तेलाच्या ड्रमने पेट घेतल्याने आगीची तीव्रता झपाट्याने वाढली. स्फोटसदृश आवाजांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली.

सुदैवाने रविवारी सुट्टी असल्याने कंपनीत कामगार उपस्थित नव्हते. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार मोठी जीवितहानी टळली आहे.

घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर येथील अग्निशमन केंद्रांच्या गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन दलाचे जवान गोदामाच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, तेलाचा मोठा साठा आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आग आटोक्यात आणताना अडथळे येत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आणि इतर बचाव यंत्रणाही घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

Ad 1
Tags: amol abhang
Previous Post

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

Related Posts

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना
ताज्या घडामोडी

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

November 23, 2026
2
सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

November 23, 2026
11
विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
ताज्या घडामोडी

विलंबित जन्म-मृत्यू नोंदणीसाठी तहसीलदारांना अधिकार; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

November 23, 2026
11
जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

जांभारीत वीजेचा खांब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

November 23, 2026
15
आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा
ताज्या घडामोडी

आलेगाव येथे धम्मप्रवचनातून सदाचाराचा संदेश; कु. अन्वीचा वाढदिवस धम्ममय वातावरणात साजरा

November 22, 2026
6
शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या दुष्काळी प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमरखेडच्या वतीने निवेदन

November 22, 2026
3

ताज्या बातम्या

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

सानपाड्यात ऑइल कंपनीच्या गोदामाला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

November 23, 2026
जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

जर्मनीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची होणार स्थापना

November 23, 2026
सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

सातेफळमध्ये आगीचा तांडव; पाच एकर ऊस जळून खाक, आग विझवताना शेतकरी गंभीर जखमी

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In