• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

तक्रारदार बजरंग आण्णा गोयकर यांचा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल; लाभार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप

भूम | प्रतिनिधी :

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील घाटनांदूर येथील रास्त भाव दुकानातून लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वितरित केले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत गावातील रहिवासी व तक्रारदार बजरंग आण्णा गोयकर यांनी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचे म्हटले आहे.

RelatedPosts

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

गोयकर यांच्या म्हणण्यानुसार, रास्त भाव दुकानातून नियमितपणे धान्य घेत असताना अनेक वेळा निकृष्ट दर्जाचे आणि आरोग्यास घातक ठरू शकणारे धान्य मिळत आहे. २८ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या धान्यामध्ये ८ किलो तांदूळ आणि १२ किलो गहू, असे एकूण २० किलो धान्य होते. मात्र, तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात तुकडे, खडे, किडे, जाळ्या व अळ्या आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच गव्हामध्ये ओलावा, बुरशी आणि किडींचा प्रादुर्भाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या प्रकाराबाबत यापूर्वीही तहसील कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर २०२६ रोजी पत्र देऊन १० सप्टेंबर रोजी संबंधित रास्त भाव दुकानात उपस्थित राहून चौकशीस सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वारंवार तक्रारी करूनही निकृष्ट धान्याचा प्रश्न कायम असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची चौकशी करून अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्या अहवालाची प्रत मागितल्यानंतर फाईल गहाळ झाल्याचे कारण देण्यात आल्याचा आरोप गोयकर यांनी केला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

२१ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या पुढील निवेदनातून बजरंग आण्णा गोयकर यांनी संबंधित रास्त भाव दुकानदाराची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, तसेच यापूर्वीच्या चौकशी अहवालाची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

वारंवार तक्रारी करूनही निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा थांबत नसेल, तर प्रशासन नेमकी कोणाची वाट पाहत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गरीब व गरजू लाभार्थ्यांना मिळणारे धान्य सुरक्षित आणि दर्जेदार असणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसील प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी व दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार बजरंग आण्णा गोयकर यांनी केली आहे.

Ad 1
Tags: Bhausaheb Munde
Previous Post

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

Related Posts

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

November 23, 2026
13
मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ
खेळ

मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

November 23, 2026
1
भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
ताज्या घडामोडी

भेंडाळा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

November 23, 2026
3
ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांची व्यथा; सात ते आठ महिन्यांपासून न्यायासाठी हेलपाटे, तरीही दखल नाही
ताज्या घडामोडी

ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांची व्यथा; सात ते आठ महिन्यांपासून न्यायासाठी हेलपाटे, तरीही दखल नाही

November 23, 2026
12
किशोर शिंपी यांची अ.भा. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड
ताज्या घडामोडी

किशोर शिंपी यांची अ.भा. श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बहुमताने निवड

November 23, 2026
8
मेळघाटच्या जंगलाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही; अदानी प्रकल्पाचे काम रोखले
ताज्या घडामोडी

मेळघाटच्या जंगलाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही; अदानी प्रकल्पाचे काम रोखले

November 23, 2026
9

ताज्या बातम्या

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

घाटनांदूरमध्ये निकृष्ट रेशन धान्याचा पुरवठा सुरूच; वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही

November 23, 2026
मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

मारेगाव येथे शिवसेनेच्या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन

November 23, 2026
मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

मुल्हेर येथे कुस्तीची दंगल रंगली; मांगीतुंगी यात्रेचा उत्साहात शुभारंभ

November 23, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In