केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन; जिल्हा परिषद सदस्या सविता तळेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
पिंपळगाव कमळेश्वर | प्रतिनिधी :
पिंपळगाव कमळेश्वर येथील गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला. केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या पाठपुराव्याने तसेच पारगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. सविता विकास तळेकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या कामाचा मार्ग मोकळा झाला.
केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करून आरोग्य उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
या आरोग्य उपकेंद्रामुळे पिंपळगाव कमळेश्वरसह परिसरातील नागरिकांना गावातच प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे.
तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही केवळ इमारतीच्या कामाची सुरुवात नसून परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांना बळ देणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या वेळी युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, वाशी पंचायत समितीच्या सभापती प्रणिता प्रवीण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या सौ. सविता विकास तळेकर, शिवहार स्वामी, सतीश शेरकर, प्रवीण गायकवाड, विकास तळेकर, अशोक खोसे, अशोक लाखे, विलास खवले, दत्ता जाधव, अमित कोळी, बाबा हारे, पोपट सुरवसे, समाधान मोटे, विनोद खोसे, तुकाराम वीर, निलेश आडमुठे, प्रकाश पाटील, राजाभाऊ जोगदंड, कालिदास जोगदंड, सतीश गव्हाणे, तानाजी पाटील, तानाजी कोकाटे, प्रकाश शेटे आणि माया अहिरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामसेवक, प्रशासकीय अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळगाव कमळेश्वरच्या विकासासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.










