इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; खाऊचेही वाटप
मोरवड | प्रतिनिधी
भारतीय संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी मोरवड येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषणांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन युवा उद्योजक विशाल मोहोळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी सहकार्य आणि मदत केली.
या उपक्रमाबद्दल महेश काळे आणि करण कांबळे यांनी विशाल मोहोळकर यांचे आभार व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.











