• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळ निवारणासह जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांना प्राधान्य द्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुष्काळ निवारणासह जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांना प्राधान्य द्या
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; पीक पाहणी, रोजगार हमी, बळीराजा पाणंद रस्ते, ई-केवायसीसह विविध योजनांचा आढावा

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी

जनगणना आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने महसूल विभागाने या दोन्ही कामांना प्राधान्य देऊन निर्धारित कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच महसूल वसुलीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

RelatedPosts

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकारी आढावा बैठक झाली. या बैठकीत महसूल विभागाची विविध कामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रशासकीय विषयांचा आढावा घेण्यात आला.

जनगणना आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने सर्व महसूल अधिकाऱ्यांनी या कामांकडे विशेष लक्ष द्यावे. गौण खनिजासह महसुली स्रोतांमधून अपेक्षित वसुली करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. पुढील आढावा बैठकीपूर्वी महसूल वसुलीच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ दिसून यावी. तसेच महाखनिज २.० प्रणालीच्या कामकाजालाही प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरवठा विभागाशी संबंधित प्रलंबित ई-केवायसी आणि आधार सीडिंगची कामे गतीने पूर्ण करावीत. रास्त भाव दुकाने, धान्य गोदामे, पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सींच्या तपासण्यांची संख्या प्रत्येक तालुक्यात वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. जलस्रोत बळकट करणे, शोषखड्डे आणि जलतारा उभारण्याच्या कामांना गती द्यावी. या कामांसाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने पर्यटनस्थळे, निवास व्यवस्था आणि पर्यटनाशी संबंधित ठिकाणी पाणी बचतीबाबत जनजागृती करावी. पर्यटकांनाही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करावे. तसेच सीआरझेडसंदर्भातील प्रकरणे आणि कामांवरही प्राधान्याने कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत (आरटीएस) नागरिकांना अधिसूचित सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात. अर्जदारांना विनाकारण विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे, न्यायालयीन कामकाज, शासकीय जमिनी, अतिक्रमणे तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत महसूल व गौण खनिज वसुली, ई-फेरफार, लोकसेवा हक्क अधिनियम, बळीराजा पाणंद रस्ते, सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे, भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, न्यायालयीन प्रकरणे आणि दुष्काळ निवारण उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पुढील महसूल अधिकारी आढावा बैठकीपूर्वी विविध कामांतील प्रलंबितता कमी करून महसूल वसुली, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि दुष्काळ निवारणाच्या कामांमध्ये ठोस प्रगती साधावी, असे निर्देश तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पवार, प्रतिभा वराळे, नितीन राऊत, बालाजी शेवाळे, आरती देसाई यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Amit Tendulakr
Previous Post

मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार

Next Post

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

Related Posts

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत
ताज्या घडामोडी

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

November 27, 2026
3
मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार
ताज्या घडामोडी

मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार

November 27, 2026
0
२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग
ताज्या घडामोडी

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

November 27, 2026
6
केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा
ताज्या घडामोडी

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

November 27, 2026
2
२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह
ताज्या घडामोडी

२८ नोव्हेंबरला कळमगाव (गन्ना) येथे संविधान सन्मान दिन समारोह

November 27, 2026
6
संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!
ताज्या घडामोडी

संविधान म्हणजे ग्रंथ नाही, तो आपल्या जगण्याचा श्वास आहे!

November 27, 2026
0
Next Post
मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

ताज्या बातम्या

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

November 27, 2026
दुष्काळ निवारणासह जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांना प्राधान्य द्या

दुष्काळ निवारणासह जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांना प्राधान्य द्या

November 27, 2026
मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार

मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In