• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर बिबट्याचे दोन दुचाकींवर हल्ले; दोघे जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर बिबट्याचे दोन दुचाकींवर हल्ले; दोघे जखमी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

काही मिनिटांच्या अंतराने दोन स्वतंत्र घटना; वनविभागाने गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी

सिंदेवाही | प्रतिनिधी

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव ते नाचनभट्टी मार्गावर बिबट्याने काही मिनिटांच्या अंतराने दोन स्वतंत्र दुचाकींवर हल्ले केल्याची घटना घडली. या हल्ल्यांत दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून, परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

हिंगणघाटमध्ये संविधानिक मूल्यांचा जागर; रॅली आणि प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम उत्साहात

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

दुष्काळ निवारणासह जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांना प्राधान्य द्या

मिळालेल्या माहितीनुसार, नाचनभट्टी-नवरगाव मार्गावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांवर झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. काही मिनिटांच्या अंतराने बिबट्याने दुसऱ्या दुचाकीवरही हल्ला केला. दुचाकीस्वारांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनांमध्ये रज्जू दशरथ चौधरी (वय ४५, रा. नाचनभट्टी कोठा) आणि गणेश मनोहर बोरकर (वय ३२, रा. उमरवाही) हे दोघे जखमी झाले आहेत.

या परिसरात मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. सध्या शेतीची कामे आणि धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी व शेतमजुरांना या मार्गावरून नियमित ये-जा करावी लागते. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

वनविभागाने या घटनांची दखल घेऊन नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर तातडीने गस्त वाढवावी आणि बिबट्याच्या वावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांनी आणि पादचाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Ganesh Mandade
Previous Post

हिंगणघाटमध्ये संविधानिक मूल्यांचा जागर; रॅली आणि प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम उत्साहात

Related Posts

हिंगणघाटमध्ये संविधानिक मूल्यांचा जागर; रॅली आणि प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम उत्साहात
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमध्ये संविधानिक मूल्यांचा जागर; रॅली आणि प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम उत्साहात

November 27, 2026
1
मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत
ताज्या घडामोडी

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

November 27, 2026
4
दुष्काळ निवारणासह जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांना प्राधान्य द्या
ताज्या घडामोडी

दुष्काळ निवारणासह जनगणना आणि मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामांना प्राधान्य द्या

November 27, 2026
6
मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार
ताज्या घडामोडी

मोरवड येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा; विशाल मोहोळकर यांचे ग्रामस्थांकडून आभार

November 27, 2026
0
२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग
ताज्या घडामोडी

२६/११ निमित्त येरमाळा पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर; ५१ रक्तदात्यांचा सहभाग

November 27, 2026
8
केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा
ताज्या घडामोडी

केज तालुक्यातील पाणीटंचाई आणि चारा प्रश्न तातडीने सोडवा

November 27, 2026
3

ताज्या बातम्या

नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर बिबट्याचे दोन दुचाकींवर हल्ले; दोघे जखमी

नवरगाव-नाचनभट्टी मार्गावर बिबट्याचे दोन दुचाकींवर हल्ले; दोघे जखमी

November 27, 2026
हिंगणघाटमध्ये संविधानिक मूल्यांचा जागर; रॅली आणि प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम उत्साहात

हिंगणघाटमध्ये संविधानिक मूल्यांचा जागर; रॅली आणि प्रबोधनात्मक कव्वाली कार्यक्रम उत्साहात

November 27, 2026
मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

मांगीतुंगी यात्रेत दोन गटांत हाणामारी; तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In