वाकण (निळकंठ साने ) पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्रामपंचायत मध्ये उबाठा व शेतकरी पक्षाला खिंडार वाकण धामणीचीवाडी येथील काशिराम गावडे यांच्या सह असंख्ये कार्यकत्यांनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रवेश प्रवेश कर्त्यांचे चाल श्रीपाद देऊन स्वागत केले व त्यांना आम्ही शिवसैनिक मनापासून वागणूक देऊ आणि त्यांना विकासापासून वंचित ठेवणार नाही असे सांगितले यावेळी या श्री चंद्रकांत कळंबे साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
तालुक्यात होणाऱ्या विकासकामांचा झंझावात पाहाता तसेच आमदार भरत शेठ गोगावले यांची वाढती लोकप्रियता बघून तसेच गोरगरीब जनतेला मिळवणारे प्रेम व होणारा विकास बघून संबंधित ग्रामस्थांनी हा पक्ष प्रवेश केला यावेळी पोलादपूर शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे उपतालुकाप्रमुख संजय मोदी युवा सेना उपतालुकाप्रमुख प्रसाद साने ग्रामपंचायत सदस्य अनंत कुंभार हेमंत साने आणि तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Discussion about this post