वणी–येथील राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.अनिता टोंगे होत्या.प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मुख्यापक श्री.अभय पारखी होते. या कार्यक्रमाचे अनुषंगाने विद्यालयातील विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा घेण्यात आली.
त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सोबतच परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व स्वच्छतेची सामुहीक शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रतीश लखमापूरे यांनी केले. प्रस्तावना सौ.र्श्रेया धोबे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.गंगारेड्डी बोडखे यांनी केले.यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
Discussion about this post