भूम:: मागील शंभर वर्षापासून अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर येथून येणारा मानाचा पलंग भूम शहरातील कसबा येथील अंबाबाई मंदिरात प्रतिवर्षी अष्टमीला येतो पण यावर्षी एक दिवस अगोदर म्हणजेच सप्तमीला हा पलंग कसबा येथील अंबाबाई मंदिरात आला होता.
भूम शहरातील कसबा येथे अंबाबाईच्या मंदिरात हा मानाचा पलंग आला असता या पलंगाचा पहिला मान मागील शंभर वर्षांपासून भूमनगरीचे राजे थोरात यांचा आहे त्यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष श्रीमंत विजयसिंह राजे थोरात व त्यांच्या परिवाराकडून कसबा येथील अंबाबाई मंदिरात अहमदनगर येथून आलेला पलंगाचे स्वागत करण्यात आले.
अहमदनगर येथून तुळजापूर ला जाणारा पलंग हा मागील शंभर वर्षापासून भूम येथे सर्वात प्रथम कसबा येथे असणाऱ्या अंबाबाईच्या मंदिरात येतो रूढी परंपरानुसार या पलंगाचा पहिला मान राजे थोरात घराण्याचा आहे राजे थोरात घराण्याचा मान घेतल्यानंतर हा पलंग भूम शहरात वाजत गाजत पेठ विभागात असलेल्या श्री दत्त मंदिरासमोर सगरे यांच्या वाड्यासमोर थोड्या वेळ विश्रांती घेतो व विश्रांती घेतल्यानंतर हा पलंग बार्शी मार्गे तुळजापूर कडे रवाना होतो
Discussion about this post