प्रतिनिधी पांडुरंग गाडे
खेड: श्रीक्षेत्र येलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माजी चेअरमन आणि विद्यमान लोकनियुक्त सरपंच श्री रणजीत गाडे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि ॲप इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी भरगोस असा निधी उपलब्ध करून दिला.
ॲप इंडिया कंपनीच्या फंडाच्या माध्यमातून शाळेला संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली त्याचप्रमाणे प्रत्येक वर्ग खोलीमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी असणारे तक्ते तयार करण्यात आले त्यामुळे वर्गांचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला आहे . तसेच शाळेतील कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायत च्या वतीने स्टेज बांधून दिला होता त्या स्टेज वरती भव्य असे शेडचे काम कंपनीच्या माध्यमातून करून देण्यात आलेला आहे. संपूर्ण शेडला पीओपी आणि लाईटिंग कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
या झालेल्या बदलामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व शाळेचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला आहे
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सरपंच श्री रणजीत शेठ गाडे व ॲप इंडिया कंपनीच्या सर्व अधिकारी वर्गाचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन केले व आभार व्यक्त केले.
Discussion about this post