99-परतूर विधानसभा मतदार संघातून बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) विजयी
जालना, (जिमाका)दि.23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 99-परतूर मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील जवाहर नवोदय विद्यालय, अंबा, ता. परतुर येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी पदमाकर गायकवाड यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 99-परतूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) यांना 70,659 मते मिळाली.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार आसाराम जिजाभाऊ बोराडे (ए.जे.पाटील) यांना 65,919 इतकी मते मिळाली. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) हे 4,740 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी पदमाकर गायकवाड यांनी बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पदमाकर गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिभा गोरे यांची उपस्थिती होती.
99-परतूर विधानसभा मतदारसंघातून एकुण 11 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते प्राप्त झाली आहेत.
अ.क्र. उमेदवारांचे नांव पक्ष मिळालेली मते
1 अहेमद महमद शेख बहुजन समाज पार्टी 692
2 आसाराम जिजाभाऊ बोराडे (ए.जे.पाटील )
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) 65919
3 बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) भारतीय जनता पार्टी 70659
4 आसाराम सखाराम राठोड पीपल्स पार्टी ऑफ इंडीया (डे.) 1279
5 कृष्णा त्रिबंकराव पवार ऑल इंडीया हिंदुस्थान काँग्रेस पार्टी 1045
6 जाधव श्रीराम बन्सीलाल जय सेवालाल बहुजन विकास पार्टी 802
7 रामप्रसाद किसनराव थोरात वंचीत बहुजन आघाडी 29810
8 अग्रवाल मोहनकुमार हरिप्रसाद अपक्ष 1633
9 अजहर युनुस शेख अपक्ष 812
10 जेथलिया सुरेशकुमार कन्हैयालाल अपक्ष 53921
11 नामदेव हरदास चव्हाण अपक्ष 997
12 नोटा — 1163
Discussion about this post