आजरा – तालुका प्रतिनिधी
राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आम. प्रकाश आबिटकर हे सलग तीन वेळा निवडून आले त्यांनी शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
आजरा तालुका मतदार संघातून मताधिक्य देण्याचे काम मतदारांनी केले या निवडणूकीत स्थानिक नेत्यांनी सोयीची भूमिका घेतल्यामुळे निकालानंतर अनेक नेत्यांची गोची झाली. गेली सहावर्षे नगरपंचायतसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीला सामोरे जाण्याच्या दृष्ठीने अनेकांनी आपापल्या संभाव्य मतदारसंघांमध्ये चांगलीच मेहनत घेतली होती.
आजरा शहरामध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून नळपाणीपुरठा योजनेसह रस्ते, गटर्स, मंदिर, सांस्कृतिक सभागृह, क्रिडा संकुलन, वाचन मंदिर आणि इतर कामा करिता सुमारे १०० कोटींचा निधी गेल्या पाच वर्षात उपलब्ध करून देण्यात आला आहे. जे मागाल ते देवू असा पॅटर्न आम. आबिटकर यांनी वापरूनही आजरा शहरामध्ये माजी. आमदार के.पी. पाटील यांनी ९५७ मतानी आघाडी घेतली तर ए. वाय. पाटील यांनी सुमारे २०० मतदान घेतले
आजरा शहरामध्ये मताधिक्य कमी होणे हा येणाऱ्या नगर पंचायत निवडणूक दृष्ठीने महायुतीने परीक्षण करणे आवश्यक आहे. आजरा शहरात मात्र मताधिक्य घटलेने महायुतीला पुढे चिंताजनक व परिक्षण करणे गरजेचे आहे
आमदार प्रकाश आबिटकर हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
Discussion about this post