नाशिक जिल्हा प्रतिनिधी:-
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात महायुतीला यश मिळाले आहे. मात्र त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे.
तसेच या निकालाच्या विरोधात आवाज उठवण्याची तयारी विरोधकांकडून करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी फेर मतमोजणीची मागणी देखील करण्यात आली आहे.
नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.
त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी फेरमतमोजणी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यासंदर्भातील पत्र नाशिकच्या जिल्हाधिकारींनी सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.
निकाल काय लागला होता :
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सीमा हिरे या विजयी झाल्या होत्या. त्यांना 1 लाख 40 हजार 773 मते मिळाली आहेत.
तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला आहे. त्यांना 72 हजार 661 मते मिळाली. तर मनसेचे दिनकर पाटील यांना 46 हजार 390 मते मिळाली आहेत.
या निकालावर सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील यांनी आक्षेप घेतला. त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यामुळे आता या या मतदारसंघात पुन्हा फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post