वाळूज महानगर वार्ताहर – राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही के जाधव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी विद्यालयात वरिष्ठ शिक्षक बी. जी गायकवाड यांनी संविधानाचे वाचन करून संविधाना विषयी माहिती दिली. तसेच 26/11रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना दोन मिनिटात मौन पाळून अभिवादन केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ई.डी.पठाण, आर.आर.सोमासे, एस. आर. जाधव,ए.एम.पाटील, जी.आर. पाटील,तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post