प्रतिनिधी पांडुरंग गाडे
जगद्गुरु जगदवंदनीय संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांचे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरती संत जगद्गुरु तुकोबारायांचे सुवर्ण मंदिराचे बांधकाम चालू आहे या मंदिराच्या बांधकामासाठी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बोरघर गावातील आदर्श माता कै. देऊबाई बुधाजी घोडे या मातेच्या स्मरणार्थ . श्री ढवळा बुधाजी घोडे यांस कडून 1 लाख 11 हजर 111 रुपयाची देणगी देण्यात आली.
हि देणगी पुणे जिल्हा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे सचिव समाज भूषण श्री संदीप भाऊ बोत्रे, श्री अनिल कारके साहेब, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. देवस्थानच्या वतीने घोडे परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले.
Discussion about this post