जामखेड: साकत घाट परिसरात आज दुपारी धनंजय कार्ले यांच्या गाडीला अचानक बिबट्या आडवा गेला. ही घटना साकत घाटातील डोंगराच्या रस्त्यावरील आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही आपत्ती घडली नाही, पण बिबट्या सध्या डोंगराकडील भागात गेला असल्याची माहिती मिळालेली आहे.
येत्या काही दिवसांत या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांनी विशेषत: साकत, सावरगाव, धोत्री आणि इतर शेजारील गावांतील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून सुरक्षितता सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे
Discussion about this post