जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसी विद्यार्थ्यांनी जनजागृती पर पथनाट्य सादर केले. यानिमित्त सोमवार पासून आठवडाभर एड्स जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पथनाथ्याच्या माध्यमातून जनजागृती केली.संस्थेचे सचिव एकनाथ जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.१ डिसेंबरला हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रमुख उपस्थिती म्हणून हर्षला एकनाथराव जाधव, प्राचार्य डॉ. शेळके, तसेच या कार्यक्रमास विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post