मुंबई – प्रतिनिधी : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३-२०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी राज्यातील पत्रकारांकडून प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, वृत्त वृत्तवाहिनी प्रतिनिधी आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्य पुरस्कार अशा चार पुरस्कारांचा समावेश आहे.
या पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविणाऱ्या पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका येत्या २५ डिसेंबर २०२४ पर्यंत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, पत्रकार कक्ष, तळ मजला, मंत्रालय, नरीमन पॉईंट, मुंबई ४०० ०३२ या पत्त्यावर किंवा mantralay@gmail.com इमेलवर या पाठवाव्या असे आवाहन वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रवीण पुरो यांनी केले आहे.
Discussion about this post