पालघर :सौरभ कामडी
जव्हार: निसर्गाने मुक्त हस्ताने रंगांची उधळण करीत जव्हारचे सृष्टी सौंदर्य वाढविले, येथील थंड हवामान विशेष प्रसिद्ध आहे.या भागात शासनाच्या, सामाजिक संस्थांच्या कल्याणकारी योजना येथील शेतीमध्ये आमुलाग्र बदल करीत आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न तथा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, त्यामुळे जव्हार तालुक्यातील फळबाग लागवड धारकांना पीक विम्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी जव्हार तालुका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी जव्हार तहसीलदारांना सोमवारी दुपारी १२ वाजता निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यात आंबा , काजू आणि इतर फळ पिके अशी फळबाग लागवड करणारे ३४१० शेतकरी असून एकूण १७६७ हेक्टर क्षेत्र आहे.त्यापैकी पिक विमा अर्ज सादर करताना काही शेतकऱ्यांना इंटरनेट, सर्वर तसेच विद्युत पुरवठा खंडित होणे अशा काही समस्या उद्भवल्या होत्या, दरम्यान पिक विमा भरण्यासाठी ३० नोव्हेंबर अखेरची मुदत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा भरणे पूर्ण झाले नाही, तथापि या योजनेला मुदतवाढ देऊन येथील आदिवासी तथा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात द्यावा असे दरोडा यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
Discussion about this post