आज दिल्ली येथे नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार खा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये खा. चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या विकासाबाबत आपली मागणी मांडली आणि संबंधित विकासकामांसाठी निवेदन दिले.
खा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी आपल्या निवेदनात जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरवस्थेवर आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता यावर लक्ष केंद्रित केले. यासोबतच त्यांनी विविध रस्ते आणि पुलांच्या बांधकामासाठी आवश्यक निधी व योजनांची मागणी केली.
Discussion about this post