अहिल्यानगर प्रतिनिधी
रोजगार हमीच्या कामांवर काम करीत असलेल्या मजुरांच्या खात्यात आठवडाभरात रक्कम जमा केली जात असताना केंद्र सरकारने सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केलेली नव्हती. त्यामुळे या मजुरांना ऐन सणासुदीच्या काळात उधार, उसनवार करण्याची वेळ आली होती. मजुरांना वर्षातील किमान 100 दिवस रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केंद्र सरकारने केला असून, त्यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या का माची रक्कम जमा केली जाते. ही रक्कम केंद्र सरकार थेट जमा करीत असते.रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे पैसे कधीही थांबवले जात नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. मागील सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केले नाही. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दोन महिन्यांची थकीत मजुरी देण्यात आली होती. तर नोव्हेंबरनंतर पुन्हा आता दोन महिने उलटूनही रक्कम वर्ग नाही.
रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे पैसे आजवर कधीही थांबविले गेले नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. परंतु मागील महिन्या भरापासून मजुरी न मिळाल्याने मजुरांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.
आता दंड कोणाला?
मजुरांना त्यांची मजुरी दर आठवड्याला बँक खात्यात वर्ग करणे शासकीय यंत्रणेला बंधनकारक आहे. त्यात जर कुणी विलंब केला तर आठवडानिहाय विलंबाचा दंड संबंधिताना लावला जातो. मात्र, आता जर मजुरीला विलंब थेट शासनच करीत असेल, तर शासनाला दंड कोण
करणार? अशा चर्चा मजुर करीत आहेत.
आठवडाभरात मजुरी न मिळाल्यास हजेरीपत्रक बंद केल्याच्या १६ दिवसानंतर प्रतिदिन मजुरीच्या ०.०५ टक्के दराने विलंब आकार दिला जातो. परंतु आम्हाला व्याज नको. एक महिन्यापासून थकलेली मजुरी देण्यात यावी, अशी मागणी मजुर वर्गाकडून केली
जात आहे..
Discussion about this post