● *पीएसआय राजेश पाटील निलंबित तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार*केज – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ आणि सकाळपासून सुरू केलेल्या रास्ता रोकोला मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट दिली आणि चर्चा केली.
त्या चर्चा नंतर अखेर या आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे एसपी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. तर केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. आरोपींचा कसून शोध घेणे सुरू असून त्याकामी पोलिसांची दोन पथके पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणाच्या तपासात कुठलीही कसर ठेवली जाणार नाही अशी ग्वाही देखील बारगळ यांनी दिली. मात्र, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात य
Discussion about this post