🪷
नायगाव विधानसभा मतदारसंघात जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आज शुक्रवार, दि. 13 डिसेंबर 2024 रोजी उमरी येथे #उमरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक आणि भाजप-महायुतीच्या कार्यकर्ते-पदाधिका-यांच्या वतीने माझा हृद्यसत्कार करण्यात आला.
आजचा हा सत्कार हे खरे तर एक निमित्त आहे. निवडणूकीच्या काळात आणि सातत्यानेच माझ्या नायगाव विधानसभा मतदारसंघातील ‘माझी माणसं’ माझ्या सोबत राहिली आहेत. त्यांचे सहकार्य आणि आशीर्वादाचा परिणाम म्हणजेच हा विजय आहे. हा विजय केवळ मिरवण्यासाठी नाही तर लोककल्याणाची कामे करण्यासाठी आणि मतदारसंघाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी आहे. नेमकी हीच भावना कायम ठेवून आता यापुढे निरंतर कार्य करणार आहे. आजच्या सत्कार प्रसंगी उपस्थितांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या आयुष्यातील क्षण न् क्षण खर्च करणार, हे मात्र नक्की!
यावेळी डॉ. विक्रम देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस), श्री. सुभाष पेरेवार (शिवसेना तालुका अध्यक्ष), श्री. संजय कुलकर्णी – माजी नगराध्यक्ष), श्री. ज्ञानेश्वर पाटील सावंत (भाजप तालुकाध्यक्ष, उमरी), श्री. बालाजी पाटील ढगे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा), श्री. पारसमल दर्डा, खाजा शेठ, श्री. गणेशराव पाटील कौडगावकर, श्री. प्रभाकर पाटील पुयड (सरपंच सिंधी), श्री. नरसिंग आप्पा मुक्कावार, श्री. बापूसाहेब पाटील कौडगावकर, श्री. देवराव पाटील हासेकर (मार्केट कमिटी संचालक), श्री. संजय सवई, श्री. ज्ञानेश्वर कदम, श्री. शाहीर जंटल, श्री. धनंजय पाटील सलगरे, श्री. शंकर पाटील गोरटकर श्री. कृष्णा सर्जे, श्री. साई ढेरे, श्री. सिद्धेश्वर चंदापुरे, श्री. मारोतराव कवळे (सरपंच), श्री. दिलीप पाटील (सरपंच), श्री. बालाजी पाटील डांगे, श्री. अर्जुन पवार, श्री. बाळकृष्ण साप्ते, श्री. गजानन पाटील आदींसह उमरी तालुक्यातील नागरिक आणि भाजप महायुतीतील पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post