भडगाव प्रतिनिधी
आपल्या विविध कामाकरिता जनसामान्यांना शासकिय कार्यालय गाठावे लागते. परंतू कागदपत्राच्या अजाणतेपणामूळे येथे असलेले दलाल लहान-लहान कामांकरिता या लोकांना लक्ष्य करुन आर्थिक भुर्दंड देतात. कार्यालयातील अधिकारी, कर्मचा:यांना हा सर्व प्रकार माहिती असतानाही अश्या दलालांवर अंकुश न लावला अधिकारी-कर्मचारी आपल्या तोंडावर बोट ठेवतात, त्यांचे हे बोट ठेवण्यामागील काय कारण असावे..
असा प्रश्न निर्माण होत आहे…?
भडगाव येथील तहसील कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध कामे घेऊन येतात. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांचा यात समावेश असतो. कुठल्या तरी कामासाठी त्यांना दाखल हवा असतो, रेशनकार्ड काढायचे असते, संजय गांधी निराधार योजनेकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची लांबलचक यादी असते, एखादा कागद कमी असल्यास दाखल्याचा अर्ज त्रुटीमध्ये निघतो. याकरिता अधिकारी स्तरावर कुठलेही मार्गदर्शन होत नाही. परंतु, एखादा कागद कमी असलेला अर्ज दलालामार्फत सादर झाल्यास विना त्रुटी तो पास होतो, हा अनेक सुज्ञ नागरिकांचा अनुभव आहे. भूमी अभिलेख कार्यालयात तर अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचीच संख्या अधिक दिसते. कर्मचारी सापडणार नाही; पण दलाल हमखास मिळतो. या कार्यालयात कुठलेही काम दलालाशिवाय झाल्यास नशीबच समजावे लागेल. एवढा या कार्यालयात दलालांचा वट आहे. काम कसे करून घ्यायचे याचा सल्ला दलालच देतात. परंतु, तो फुकट नसतो, हे सर्वश्रुतच आहे.
अशावेळी त्यांना दलालांचा आधार घ्यावा लागतो. मग कामाचा मार्ग सुकर झाल्याचा अनेकांचा अनुभव आहे. व दलालांचीच चलती असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्रस्त नागरिक दलालांना गाठतात. हे चित्र या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपुढे दररोज असते. दलालांना बाहेर काढण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
कर्मचाऱ्यांसोबत उठबस वाढली
दलालांची शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत उठबस वाढली आहे. शिवाय, त्यांच्यासोबत चहापाणी घेणे, नाश्ता करणे अशी त्यांची दीनचर्याही सुरू झाली आहे. हा प्रकार दलालांसाठी पोषक ठरत आहेत….
Discussion about this post