यांनी तरुण खेडाळुंच्या भविष्याचा विचार करुन डॉक्टर लाहोटी साहेबांच्या मार्गदर्शनात सिनियर शुटींगबॉल अजिंक्यपद जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व बुलढाणा जिल्हा असोसिएशन चे खूप खूप आभार..
दिनांक १८-१२-२०२४ वेळ सकाळी ११ वाजता सुलतानपूर
शुटींग बॉल SHOOTING BALL हा खेळ मूळ भारतीय उपखंडात जन्मलेला देशी खेळ आहे.[ संदर्भ हवा ] व्हॉलीबॉल हा खेळ जसा खेळला जातो तसाच परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने , वेगळ्या नियमांनी आणि वेगळ्या चेंडूने हा खेळला जातो. शुटींग बॉल ह्या खेळाला भागानुसार वेगवेगळे नावे पडलेली आहेत.
मूळ म्हणजे या खेळाला डायरेक्ट व्हॉलीबॉल, शॉटी व्हॉलीबॉल अशा नावांनी देखिल ओळखले जाते. नावात साम्य आल्याने बऱ्याच वेळा शुटींग बॉल आणि व्हॉलीबॉल हे समजण्यात गैरसमज होत असल्याने ह्या खेळाला शुटींग बॉल हे नाव पडले. नावाप्रमानेच हा खेळ आहे, समोरच्या संघाकडून आलेला चेंडू हा शुट म्हणजे मारावा लागतो म्हणून नाव पडले शुटींग बॉल. व्हॉलीबॉल मध्ये चेंडू प्रतिस्पर्ध्याकडे परतवण्यासाठी तीन वेळा हाताळता येतो तसा शुटींगबॉल मध्ये एकाच प्रयत्नात चेंडू परतवणे आवश्यक असते. शुटींग बॉल मध्ये एका संघात 12 खेळाडू असतात त्यापैकी ७ खेळाडू हे मैदानात असतात व ५ खेळाडू राखीव असतात. चेंडू हा चामड्यापासून बनविलेला असतो. त्यामुळे तो व्हॉलीबॉल पेक्षा खूप कडक असतो.
महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब , उत्तर प्रदेश आदी राज्यात हा खेळ गावागावात खेळला जातो.
भारत तसेच ,पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, U A E , अशा आशियायी राष्ट्रांमध्ये हा खेळ लोकप्रिय आहे.
ऑस्ट्रेलिया, कॅनडा , अमेरिका , न्यू झीलंड ,अमेरिका व आफ्रिकान राष्ट्रांमध्ये शुटींग बॉल खेळ आवडीने खेळला जातो.
महाराष्ट्र शासनाने शुटींग बॉलच्या संघटकांना व खेळाडूंना राज्याच्या सर्वोत्कृष्ट अशा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरवान्वित केले आहे.
Discussion about this post