प्रतिनिधी:- विजय खलाने
बोईसर : बोईसर परिसरातील दहावीत शिकणाऱ्या एका शाळकरी विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून सर्वानाच धक्का बसलाय.
बोईसर पश्चिमेस खैरेपाडा परिसरात एक नामांकित टीन्स वर्ल्ड कॉर्पोरेट शाळा आहे. या शाळेत नितीन मुखिया (वय १७) शिकत होता. आई-वडील दोघेही मजुरीसाठी घराबाहेर असताना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास नितीन याने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना घडली. शेजारी राहणाऱ्या लहान मुलांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नितीनला तातडीने बोईसर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

◾आत्महत्या करणापूर्वी काय केले मुलाने व्हॉइस रेकॉर्डिंग
आप दोनो बुरा मत मानियेगा मे आप दोनो की मेहनत को सिर्फ डूबा रहा हुं, इतने पैसे आप मेरे उपर खर्च कर रहे हे, तभी भी सिर्फ वेस्ट किये जा रहा हुं, मुझे माफ कर देना, मे स्कुल मे इसलिये नहीं जाता क्युकी मुझे लोगोको अच्छा नहीं लगता मेरा मझाक उडाए.
◾मुलाच्या वडिलांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली
विद्यार्थी आणि शिक्षकांकडून आपल्या मुलाचा भरपूर छळ होत असल्याने त्याने आत्महत्या केली त्यामुळे असे दुसऱ्या कोणत्याही मुलांसोबत होऊ नये म्हणून पोलिसांनी तपास करुन दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मृत मुलाच्या पालकांकडून करण्यात आले आहे . या घटनेनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपासानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे बोईसर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Discussion about this post