- पंचायत समिती शिक्षण विभागाकडून पुरस्काराचे आयोजन
गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : पंचायत समितीचे पहीले सभापती दिवंगत आमदार लोकनेते भाऊसाहेब माने हे हाडामासाचे शिक्षक होते . त्यांनी उमरखेड तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्यामुळे सन २०२० मध्ये माजी सभापती प्रजानंद खडसे यांनी पंचायत समिती उमरखेड मधील उत्कृष्ठ व उल्लेखनीय कार्य आणि उपक्रमशील शिक्षकांनां भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा या उदात्त हेतुने सुरु केला होता . त्यामुळे आज रोजी पंचायत समिती सभागृहात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली २१ आदर्श शिक्षकानां, शिक्षिकांना भाऊसाहेब माने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती उमरखेड चे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी सतिश दर्शनवाड, भाऊसाहेब माने जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, भाऊराव चव्हाण, केद्रप्रमुख अनिल बोपीनवार वार, रामदास केन्द्रे, संतोष घुगे, बिंबरवाड, पेंढारकर, निलपवार, कर्णेवाड, प्रविण सुर्यवंशी, विजय मुंगे, सर्व केंद्रप्रमुख विचार पिठावर होते.
यावेळी भाऊसाहेब माने यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार देणे मागचे कारण हे आहे की, आजच्या शिक्षकांनी भाऊसाहेब माने यांचा आदर्श घेऊन नव्या पिढीला स्पर्धेला युगात टिकण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शिक्षण द्यावे, असे विचार गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी काढले, तर
१७७ शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांची निवड कशी करावी हा मोठा प्रश्न होता. पण आमच्या निवड समितीने प्रत्येक केन्द्रातील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तेवर काम करणाऱ्या शिक्षकांचे मुल्यांकन करुन निवड केली. निवड झालेले सर्व सत्कारमूर्ती शिक्षण विभाग पंचायत समिती उमरखेडचे हिरे आहेत आणि जंगल भागातील नंदनवनात उत्कृष्ट काम करत आहेत. असे गटशिक्षणाधिकारी सतिश दर्शनवाड यांनी उदगार काढले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण सूर्यवंशी यांनी संचलन गजानन देवकते यांनी तर आभार सुरेश वाघ यांनी केले
चौकट :
शालीग्राम उबाळे तरोडा, सचिन डुब्बेवार तरोडा, भुंजगा इनकर सुकळी, अशोक वंजारे कोरटा, .प्रकाश मोहकर बुरकुलवाडी, सतिश बन्सोडे बिटरगांव, नितिन उघडे थेरडी, नथ्थु पुंडे तिवरंग, वैशाली कुलथे बेलखेड, मनोज कटकमवार चालगणी, गोविंद फड बिंटरगाव, गुलाबराव देशमुख पिरंजी, विशाल रनमले चिखली, कैलास चव्हाण गांजेंगांव, देवका चव्हाण घमापूर, अमरीन बेगम मुखीद अहमद ढाणकी, संतोष घुगे चिखली, अरुण बुरकुले सुकळी, अविनाश नरवाडे एकंबा, बालाजी कदम नागापूर, गजानन जाधव गट संसाधन केंद्र, उमरखेड या 21 जणांचा सत्कार करण्यात आला
Discussion about this post