रांजणगाव गणपती प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार
नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी दीक्षित समारंभ मधील कुमार अमित चंद्रभागा रामदास तळोले राहणार कान्हूर मेसाई याने पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले. लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक पदी निवड झाली.
त्याचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा व विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई येथे झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण पुणे येथे पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. घरची परिस्थिती हालाखीची होती आई मजुरी करून घरकाम सांभाळत होती, तर वडील शिवणकाम करून मुलांच्या शिक्षणाचा भार सांभाळत होते. अमितला सरकारी नोकरीमध्ये करियर घडवायचे होते.
त्याने आधीच सांगितले होते की मी सरकारी नोकरी करेन नाहीतर शेत मजूर म्हणून काम करेन इतर कुठे नोकरी करणार नाही. अफाट मेहनत घेऊन, कधी कधी उपाशीपोटी राहून अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले. सुरुवातीला दोन मार्कावरून अपयश आले, नातेवाईक सांगायची की दुसरीकडे नोकरी कर पण जिद्द व चिकाटी न सोडता अभ्यासात सातत्य ठेवत यश संपादन केले. कोरोनाच्या काळात दुःख घटना घडली. वडील रामदास तळोले यांचे निधन झाले. तरीदेखील जिद्द व चिकाटी अभ्यासात सातत्य ठेवत यश संपादन केले. आई चंद्रभागा, भाऊ नितीन, नातेवाईक यांनी त्याला धीर व प्रेरणा दिली.
खरोखरच शून्यातून शिखरावर पोहोचता आले असे वाटते. यश मिळवण्यासाठी अमितला विचारले असता सांगितले की सतत मेहनत व एकाग्रता असणे गरजेचे. आपल्या ध्येयावर आपले लक्ष असले पाहिजे. बाकीच्या इतर गोष्टीकडे नजर फिरवायची नाही, फोन, सोशल मीडिया, मित्र,यात्रा समारंभ यापासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास आणि अभ्यासच केला तर सर्व काही मिळते असे पीएसआय पदी निवड झालेल्या अमितने सांगितले. सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांचे योगदान असावे लागते व तेही मला मिळाल्याचे अमितने सांगितले.
Discussion about this post