नायगांव प्रतिनिधी/दिपक गजभारे घुंगराळेकर…
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला एक संघ ठेवणारा स्वतंत्र समता बंधुता आणि न्याय या मानवी मूल्यांची जपणूक करणारा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार एकमेव राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. संविधान दिनाचे महत्त्व आपल्या देशाचे सर्व कायदे व राज्यघटनेने बनवलेले आहेत . सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय संसद विधिमंडळ मुख्यमंत्री असे देशातील सर्व न्यायालय या अंतर्गत काम करतात या आपल्या सर्वांना हक्क प्राप्त ,जेणेकरून आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेचे जीवन जगू शकतो . संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. ज्या राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ते जगातील एकमेव ग्रंथ म्हणजे संविधान या संविधान दिनानिमित्त कुंटूर येथे 25 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर च्या मैदानावर वेळ सकाळी 11 ते 2 पर्यंत कार्यक्रम . संविधान जनजागृती महत्त्वाचे आयोजन करण्यात आलेले आहे . या संविधान जनजागृती महोत्सव सोहळ्याच्या अध्यक्ष नायगाव तहसीलदार धम्मपिया गायकवाड हे राहतील तर प्रमुख उपस्थिती मा. क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी बिलोली, सौ. स्वाती दाभाडे उपविभागीय अधिकारी धर्माबाद. मा. रफिक शेख उप. वि.पोलीस अधिकारी बीलोली, व्याख्याते प्रा. विठ्ठल कागणे परभणीकर, विजय गोणारकर ज्येष्ठ व्याख्याते, आर एल वाजे गट विकास अधिकारी नायगाव, आर.एस. पाटील. पोलीस निरीक्षक कुंटूर. कैलास बोंडले युवा उद्योजक , रुपेश देशमुख कुंटूरकर संचालक कुंटूर. यांची उपस्थिती लाभणार आहे .

या कार्यक्रमासाठी नायगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या राष्ट्राचा सर्वात मोठा ग्रंथ असलेल्या संविधान जागृती करण्यासाठी मौजे कुंटूर तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे संविधान जनजागृती महोत्सवाचे वर्ष दुसरे साजरा कर करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर च्या मैदानावर होणार आहे. तरी सर्व गावातील महिला, नागरिक ,विद्यार्थी,व तरुण मंडळी उपस्थित राहावे व या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे संविधान जनजागृती महोत्सव समिती कुंटूर मार्गदर्शक प्रा . के .टी.हनुमंते ,मा. मंगेश खंडू हणवटे केंद्रप्रमुख , डा.विलास पवार कुंटूर तांडा, सुधाकर जयराम झुंजारे ग्रा.पं.सदस्य कुंटूर ,दत्तात्रय आयलवार सरपंच सुजलेगाव ,व आयोजक बालाजी लक्ष्मण हनमंते पत्रकार कुंटूर ,माधव केरबा धडेकर पत्रकार धनंज ,अनिल चंदर कांबळे पत्रकार कुंटूर, प्रकाश महिपाळे, किरण वाघमारे,मालोजी झगडे, सुधाकर डोईवाड, रतन झुंजारे ,बालाजी पुयड, गोदाजी परडे, चांदू अंबाडवाड, दीपक गजभारे, सिद्धार्थ गजभारे, अफरोज चौधरी ,सुभाष भोसले ,सदाशिव गाजलवाड, समस्त संविधान समिती कुंटूर सर्कल यांनी आव्हान केले आहे….
Discussion about this post