पालकमंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री.जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीची विल्हेवाट लावण्याचा मक्ता (ठेका)पालकमंत्री कडे असतो.पाहिजे तितकी चोरी करू शकतो.एक मंत्री पालकमंत्री बनला किंवा बनवला तर एका वर्षात कमीतकमी दोनशे कोटी कमवू शकतो.
असे आजपर्यंतचे आकडे सांगतात.जिल्हा विकास नियोजन समिती म्हणजे निधी वाटपाचे दुकान असते.जळगावला पंदरा टक्के द्या आणि निधी घ्या.तो निधी कामासाठी वापरा किंवा नका वापरू, कोणी विचारणार नाही.ही हमी पालकमंत्री घेतो.धुळे येथे हाच दर पंचवीस टक्के होता.
असा दर प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा असतो.बिचाऱ्या करदाता आणि मतदाताला हे माहितही नसते.माझा कर कसा चोरी होतो?माझा आमदार कशी चोरी करतो? या चोरीत पालकमंत्री जिल्ह्यातील सर्वच आमदार खासदारांना सहभागी करून घेतो.कलेक्टर हा या चोर समीतीचा सचिव असतो.त्याच्याच सहीने हा निधी ट्रेझरी मधून बाहेर पडतो.
या चोरांना अडवणारा कलेक्टर अजूनतरी कोणत्याही मातेने जन्माला घातला नाही.कोणत्याही बापाने चांगला संस्कार केला नाही.याच चोरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त, स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाते.अनेक बावळट नागरिक ठेवणीतील कपडे इस्तरी करून घालून हजेरी लावतात.त्याबद्दल त्यांना एक चहा, चॉकलेट दिले जाते. जेणेकरून पालकमंत्री चे भाषण संपताच टाळी वाजवली पाहिजे.
टाळी वाजवून आपण गब्बर सिंगला रामगड लुटण्यासाठी सम्मती प्रदान करतो.यात अधिकतम रिटायर मिलीटरीमन असतात.त्याला एक्स सर्व्हिसमन म्हणतात.तो जरी चीन पाकिस्तान मधील शत्रूला गोळी घालत होता पण येथे फक्त टाळी वाजवतो.देशांतर्गत शत्रूला गोळी घालत नाही.तो क्रांतीवीर मधील राजकुमार किंवा नाना पाटेकरचा रोल करीत नाही.
आता कळले पालकमंत्री बनण्यासाठी मंत्री का रूसवे फुगवे करीत आहेत?नसेल कळले तर माजी पालकमंत्री सतीश पाटील किंवा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना भेटून सर्विस्तर माहिती घ्यावी.एकनाथ खडसेंना सुद्धा याबाबत इत्यंभूत माहिती आहे.पण त्यांना अजूनही पालकमंत्री बनण्याची अपेक्षा आहे.सतीष पाटील आणि गुलाबराव देवकर यांना तशी भविष्यात संधी नाही.म्हणून ते प्रामाणिकपणे सांगतील.अशी मला अपेक्षा आहे.शेवटी शेवटी तर रावण सुद्धा सत्य सांगून जातो.कि मला रामाच्या हातून मरण पाहिजे होते म्हणून मी सीतेला पळवून नेले होते.तर यांनी पण सांगितले तर खूप उपकार होतील.
महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस उठसूठ छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेतो.स्वताला मराठा मराठा म्हणून मिरवतो.पण येथे मराठी बाणा हरवलेला दिसतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा वेळा नांव घेतात तर एकदा तरी त्यांच्यासारखा मराठी बाणा दाखवला पाहिजे.
मला माझे साथीदार सांगतात.तुम्ही एखाद्या पक्षात जाऊन निवडणूक लढवली तरच विजयी होणार.मी म्हणतो,मी भारतातील कोणत्याही पक्षात जायला तयार आहे.पण मला कोणी घेत नाही.म्हणे तुम्ही आपल्याच पक्षातील आमदार खासदार मंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री ला भ्रष्टाचार करू देणार नाहीत.कारण भ्रष्टाचार केल्याशिवाय कोणीच आमदार खासदार मंत्री नगरसेवक निवडणूक लढत नाहीत.भ्रष्टाचार हाच तर राजकीय पक्षांचा मेन अजेंडा असतो.मग तो पक्ष मोदींचा असो किंवा पवारांचा किंवा ठाकरेंचा किंवा राहुल गांधींचा.खात्री करण्यासाठी आमदार खासदार मंत्रींची संपत्ती मोजून पहा.
जळगाव जिल्ह्यातील एक राजकीय कार्यकर्ता व्हिडिओ वर म्हणाला होता कि, जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला होता.हा व्हिडिओ इंग्लंड मधे सुद्धा पाहिला.पण यातील पुर्ण सत्य हे आहे कि,एकिकडे पैशांचा मुसळधार पाऊस होता तर दुसरीकडे पैशांची झडी होती.नेते,कार्यकर्ते ,मतदार यात न्हाऊन निघाले.काही तर वाहून गेले. …. शिवराम पाटील ९२७०९६३१२२महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव… 🙏
Discussion about this post