नायगाव ता प्रतिनिधी –
दिपक गजभारे घुंगराळेकर
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे आयोजित केलेल्या संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमात भारतीय संविधान जागृती प्रचार व प्रचारार्थ दिलेल्या भरीव योगदानाबद्दल आपल्या दैनिकातून प्रसिद्धी दिल्याने या कार्याची दखल घेऊन नरसी येथील पत्रकार सय्यद अजीम हाजी हुसेनसाब नरसीकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जगात सर्वात मोठी लोकशाही भारतीय संविधानातून भारतीय लोकांना मिळाली आहे,अथक परिश्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटना बहाल केली त्या संविधानाचे महत्त्व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले जावे या उद्देशाने कुंटूर येथे संविधान जागृती महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड तर उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख,रुपेश देशमुख कुंटूरकर,व्याख्याते विठ्ठल कांगणे, प्रा. के टी हनुमंते, केंद्रप्रमुख मंगेश हनवटे, डॉक्टर विलास पवार, सुजलेगावचे सरपंच दत्तात्रय आईलवार, सुधाकर झुंजारे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान प्रेमी पत्रकार सय्यद अजीम यांना आपल्या वर्तमानातून दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार बालाजी हनुमंते, माधव धडेकर, अनिल कांबळे यांनी केले होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालोजी झगडे, सुधाकर डोईवाड, सुभाष पाटील भोसले, राजेश गाजलवाड, रतन झुंजारे, बालाजी पुयड, चांदू आंबटवार, सिद्धार्थ गजभारे, अफरोज चौधरी यांनी परिश्रम घेतले आहे…
Discussion about this post