वर्दी हि सदरक्षाय खलनिग्रहणाय ब्रिद पोलीस दल नागरिकांच्या रक्षणाचे स्काॅट लैंड नंतर महाराष्ट्राच्या पोलीसांचा गवगवा देशात होता.दुर्देव हे की, पोलीस खात्यात जेव्हा पासुन राजकिय शिरकाव झाला तेव्हा पासुन वाण नाही पण गुण पोलीसांना लागला. शेंबड्या राजकारण्याला वाचाळविराला पोलीस संरक्षण का,दिले जाते हेच मोठे दुर्देव जनतेच आहे.सामान्य माणुस कस्पटासमान वाटु लागला.
चिमुकलीवर बलात्कार होऊ लागले. वृध्द, महिला कोणी हि सुरक्षित नाही या शोकांतिकेचा पोलीस दल विचार करणार आहे की नाही.पोलीसांनी विचार करावा वर्दिच्या आत माझं मानवी शरिर आहे.परिवार व नागरिक यांचेशी समाज म्हणून सामाजिक बांधिलकीने गुंतलेले असताना क्षणभराच्या चंगळवादासाठी माझी नितीमत्ता नैतिकता का धुळीला मिळवु,
आयुष्याची धुळधाण करु मानवी देहाची का विटंबना करुन घेत आहे. राजकारण्याची कारकिर्द आज आहे उद्या नाही,परंतु नियमानुसार माझे व जनतेच्या रक्षणाचे कवच मला आहे.हेच तोडले तर मला माणुस म्हणुन जगता येणार नाही,
हा विचार केला तरच सदरक्षाय खलनिग्रहणाय याचे पावित्र्य राखुन वर्दीच्या आतला मानवी देह हा माणुस म्हणुन जगु शकतो आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामा. कार्यकर्ता
Discussion about this post