मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय आंध आदिवासी उपवर वधु परिचय मेळाव्याचे आयोजन,
आदिवासी कर्मचारी संघटना पुसद ट्रेड युनियन एनजीपी द्वारा पुसद येथे आज दि. २९ डिसेंबर २०२४ रोज रविवारला आयोजित केले आहे.
सदर उपवर वधू परिचय मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ॲड शिवाजीराव मोघे (माजी मंत्री )हे राहतील. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा.उत्तमराव इंगळे (मा. आमदार )यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख अतिथी संभाजीराव सरकुंडे माजी सनदी अधिकारी, माधवराव वैद्य,जानकीरामजी डाखोरे, मा.पोलीस अधीक्षक, डॉ.संतोष टारपे मा.आमदार, डॉ.आरतीताई फुपाटे, सुनील लोखंडे, डॉ.शामराव वाकोडे, तुकाराम भिसे, सौ.जनाबाई डुडूळे, प्रकाश झळके, डॉ. नामदेव सरकुंडे, डॉ.संजय डाखोरे, डॉ. एम. बी. डाखोरे, मा.नियोजन अधिकारी, प्रा.पंडित काळे, प्रा. डॉ.विशाल इंगळे, सौ. नंदिनी टारपे, व ई. राहणार आहे.
आजच्या धकाधकीच्या काळात वेळ, पैसा, अधिक खर्च न होता व समोरासमोर सर्वांच्या उपस्थितीत उपवधू वर परिचय मेळावा झाल्यास आपल्या पसंतीनुसार लगेचच आपण पसंती करून पुढील कार्यास उपवर वधू, तथा पालकांनी विचार विनिमय करून पुढील कार्य ठरवावे जनेकरून तुमचा खर्च व वेळ वाचेल या उद्देशाने वरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विनित : आदिवासी कर्मचारी संघटना पुसद अध्यक्ष लक्ष्मण टारपे, उपाध्यक्ष पंजाब बेले,उपाध्यक्ष सौ.तेजस्विनी कबले ( इंगळे ) कार्याध्यक्ष मधुकर मोरझडे, कोषाध्यक्ष राजेश पुकसे,सचिव दिनेश खेकाडे, सहसचिव गजानन बेले,सल्लागार डॉ.हरिभाऊ फुफाटे,सुरेश धनवे,राजेश ढगे ,गंगाराम काळे,
तरी जास्तीत जास्त राज्यातील तसेच जिल्ह्यातील आंध आदिवासी उपवर वधू वरांनी वरील परिचय मेळाव्याला पुसद येथे २९ डिसेंबरला सकाळी ठिक ११:०० वाजता स्थळ जिजामाता मंगलम,आसेगावकर पेट्रोल पंपाच्या बाजूला कारला रोड पुसद येथे उपस्थित राहावे.
असे आवाहन आनंद खुळे,वाशिम जिल्हाध्यक्ष तथा डॉ. एम. बि. डाखोरे, मा.नियोजन अधिकारी वाशिम यांनी केले आहे


Discussion about this post