राजगुरूनगर खेड जिल्हा पुणे येथे घडलेल्या दोन चिमुरड्यांवर अत्याचार करून निघून हत्या केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन इचलकरंजी प्रांताधिकारी सो इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंच यांच्यावतीने देण्यात आले या या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की
पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर खेड येथील माणुसकीला काळिमा फासणारी घटना दि.२२/१२/२०२४ इ रोजी घडली आहे. तिथे बार मध्ये वेटर काम करणाऱ्या अजय दास नावाच्या परप्रांतीयाने तेथेच शेजारी मजुरी करण्याऱ्या गोसावी (मकवाने) समाजातील कुटुंब राहत होते. त्यांना कार्तिकी वय वर्ष ८ व दुर्वा वय वर्ष ९ अशी दोन मुली असून, या दोघींच्यावर अत्याचार करून, प्लास्टिकच्या बरैलमध्ये बुडवून अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे कृत्य म्हणजे अत्यंत निर्दयी व समाजमन हेलावून टाकणारे आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा
देण्यात यावी यासाठी

इचलकरंजी व परिसर गोसावी समाज विकास मंच यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहरातून सकाळी 11 वाजता गांधी पुतळा ते प्रांताधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढून नराधमाला फास्टट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घोषणा देण्यात आल्या
इचलकरंजी गोसावी समाज यांच्यावतीने निवेदन देण्यासाठी आमदार राहुल आवडे हे देखील उपस्थित होते निवेदन देत असताना आमदार राहुल आमदार राहुल आवाडे यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असून समाजाला हेलावून टाकण्यासारखी आहे अशा शब्दात निषेध व्यक्त केला निवेदन देत असताना
संजय गोसावी ,सागर जाधव अनिल मुरळेकर आकाश चव्हाण भरत जाधव दिलीप जाधव संजय घाटगे बापूसो जाधव सोनाली गोसावी लहू गोसावी श्रीकांत गोसावी रवी गोसावी नेताजी पडियार रोहन गोसावी अमर गोसावी बाबासाहेब जाधव चंद्रकांत पडियार रमेश झुबे सागर जाधव अनिल जाधव सुभाष माळी विशाल माळी संजय माळी इत्यादी पुरुष व महिला निवेदन देत्या वेळीमोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post