- मानोरा तालुक्यातील १५७४९ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झाले होते नुकसान
- तालुक्यातील शेतकरी वर्ग आंदोलनाच्या तयारीत
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा प्रतिनिधी : ३१ऑगस्ट २०२४ मध्ये मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ते ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले यामध्ये १५७४९ शेतकऱ्यांचा समावेश असून तब्बल १०८९२ हेक्टर क्षेत्रफळात जमिनीवरील पिके खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा अहवाल हा प्रशासना मार्फत पाठविण्यात आले असताना १४ कोटी ८१ लाख ३४१९२ रुपये नुकसान भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांना केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सन २०२४ च्या अतिवृष्टी पाठोपाठ दि २ नोव्हेंबर मध्ये ही अतिवृष्टीने मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात ३१ ऑक्टोबर २ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे मानोरा मंडळातील ५ गावे तर गिरोली, इझोरी, उमरी (बु ) या मंडळातील फळबाग ,भाजीपाला सोयाबीन,कपाशीसह इतर पिकांचे नुकसान झाले असताना १०८९२ बाधित शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळ जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले तर मानोरा, गिरोली, उमरी( बु),इझोरी या मंडळातील शेतकऱ्यांच्या १०८९२ हेक्टर क्षेत्रफळ जमिनीवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अशाप्रकारे सर्व मंडळातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येऊन तलाठी,कृषी सहायक, ग्रामसेवक या त्रिस्तरीयपथकाने पंचनामे केले व केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण १५७४९ बाधित शेतकऱ्यांच्या १०८९२ क्षेत्रफळातील जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून याबाबत तब्बल १४ कोटी ८१ लाख ३४हजार १९२ रुपये नुकसान भरपाई च्या निधीची अपेक्षित म्हणून अहवाल हा तहसील कार्यालयाकडून मानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अशाप्रकारे सर्व मंडळातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येऊन तलाठी, कृषी सहायक ,ग्रामसेवक या त्रिस्तरीयपथकाने पंचनामे केले व केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण १५७४९ बाधित शेतकऱ्यांच्या १०८९२ क्षेत्रफळातील जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
मानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीमुळे एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने या शेतकऱ्यांना मात्र अद्याप पर्यंत अतिवृष्टीची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे सन २०२४ मधील अतिवृष्टीच्या मदतीपासून आहे.
तालुक्यातील असंख्य शेतकरी वंचित असताना आता सन २०२४ च्य अतिवृष्टीचे आर्थिक मदत ही केव्हा कशी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे राज्यातील सरकार आता सत्तारूढ झाले आहे त्यामुळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्य मदतीबाबतचा विचार करून अतिवृष्टीची रक्कम ही शेतकऱ्यांच्य खात्यात तातडीने जमा करावी अश मागणी ही शेतकऱ्यातर्फ केल्या जात
बॉक्स …..
महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर खेडणारे,शेतकरी विरोधी अरविंद पाटील इंगोले
महायुती सरकार याआधी होते आता पण या सरकारला घवघवीत यश आले तरी पण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढल्या जात नाही जेव्हा 2024 मध्ये अतिवृष्टी झाली परंतु अध्यापही त्यांना जाहीर केलेले अनुदान दिले नाही हे महायुती सरकार शेतकरी विरोधी व शेतकऱ्यांच्या जीवाशी खेडणारे सरकार आहे यांनी तात्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खातात जमा करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) वतीने आंदोलन केल्या जाईल असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विधमान सदस्य अरविद पाटील इंगोले यांनी प्रस्तृत प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले
बॉक्स ….
मानोरा तालुक्यातील मंडळत अतिवृष्टीचे तात्काळ अनुदान दया डॉ रोठे
मानोरा तालुका हा आधीच मागासलेला म्हणून गणल्या जातो त्यामध्ये महायुती सरकार शेतकरी यांना अनुदान,शेतकरी योजना असेल त्याचा फायदा शेतकऱ्यां पर्यंत पोहचत नसल्याने व येथिल अधीकारी वर वचक नसल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नागपूर येथे या संदर्भात निवेदन देणार आहोत शेतकऱ्यांना तात्काळ अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे यांनी सांगितले
Discussion about this post