वाळूने भरलेला डंपर कारवाईसाठी घेऊन जाणाऱ्या वनरक्षक कर्मचारी यांना स्कार्पिओ गाडी मधून अज्ञात तीन अनोळखी इसमांकडून दमदाटी धक्काबुक्की करून डंपर बळजबरीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील बेट नाका येथे घडली असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर वृत्त असे की..विठ्ठल दादा राम सानप हे दिनांक 29 डिसेंबर २०२४ रोजी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास धारणगाव शिवारातील पेट्रोलिंग करत असताना त्यांनी वाळूने भरलेला डंपर धारणगाव शिवारातून पकडून पुढील कारवाईस करता घेऊन जात असताना कोपरगाव शहर नजदीक बेट नाका येथे आले असता बिना नंबरची स्कार्पिओ गाडीमध्ये असलेल्या इसमानी सदर स्कार्पिओ गाडी आडवी लावली व त्या डंपर मध्ये बसलेल्या वनरक्षक अधिकारी सानप यांना धक्काबुक्की शिवीगाळ दमदाटी करून त्यांना डंपर मधून खाली उतरून दिले सदर डंपर बळजबरीने पळून घेऊन गेले
अशी तक्रार वनपाल विठ्ठल सानप त्यांनी सदर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे त्याप्रकरणी भारतीय न्याय सहित 126 2 309 132 351 2 121 1प्रमाणे करण्यात आला होता त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2024 तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत
नाशिक जिल्हा प्रतिनिधी-अमित गाडे
सारथी महाराष्ट्राचा कोपरगाव
Discussion about this post