प्रतिनिधी:- प्रदीप राऊत
नववर्ष 2025 चे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे.जवाहर वाचनालय माटरगाव बु ता शेगाव जि बुलढाणा येथे आज हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री अजाबराव देशमुख गुरुजी यांनी भूषविले.सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.याप्रसंगी केशवराव नाना देशमुख, गजानन राऊत, संजय वानखडे, रामभाऊ जी दळवी गुरुजी,म.प्रा कन्या शाळेचे मुख्याध्यापक माळवे सर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व वक्त्यांनी वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर भर दिला.मुलांना बालपणापासूनच वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जवाहर वाचनालयाचे अध्यक्ष रवींद्र मुकुंदराव खुटाफळे यांनी केले.तर अनिल जुमळे यांनी आभारप्रदर्शन केले.अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.याप्रसंगी जवाहर वाचनालयाचे सचिव, माजी जि. प. सदस्य अनंतरावजी आळशी, जोशी मॅडम,वसतकार मॅडम,विनायक मिरगे,बाळुभाऊ झाडोकार,अता मोहम्मद, पत्रकार बाळु भाऊ देशमुख,मनोज काळे, विशाल मंडवाले, विद्यार्थी, विद्यार्थीनी,वाचक ,संस्थेचे सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रंथपाल श्रीकांत देवचे ,बाळू चोरे व मंगेश राऊत यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Discussion about this post