छत्रपती संभाजीनगर शहर प्रतिनिधी
मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी प्रक्रिया पूर्ण करुन लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा मुंबई शहरातील विविध परिक्षा केंद्रांवर घेण्याचे प्रस्तावित होते. त्याअनुषंगाने पोलीस शिपाई (चालक) पदाची लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, कारागृह शिपाई पदाची लेखी परिक्षा दिनांक ११/०१/२०२५ रोजी दुपारी २:३० वाजता आणि पोलीस शिपाई पदाची लेखी परिक्षा दिनांक १२/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता घेण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) व कारागृह शिपाई पदाच्या लेखी परिक्षेकरिता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना लेखी परिक्षेची प्रवेशपत्रे या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
सर्व उमेदवारांना सचित करण्यात येते की, या संकेतस्थळावरुन मुंबई पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (चालक) व कारागृह शिपाई पदाच्या लेखी परिक्षेची प्रवेशपत्रे संबंधित उमेदवारांनी डाऊनलोड करुन घेऊन लेखी परिक्षेसाठी उपस्थित रहावयाचे आहे.
लेखी परिक्षेसंदर्भातील महत्वाच्या सुचना उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचील साठी शुभेच्छा
Discussion about this post