आंबेखारी येथे दिनांक 06 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रामदास मसराम यांनी खेळांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील योगदान यावर प्रकाश टाकला.
उद्घाटन सोहळ्यात स्थानिक अधिकारी, शिक्षकवर्ग, पालक, तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. स्पर्धेत विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धांमधून विजयी विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.
त्या वेळी उपस्थित .काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल,हकिमुद्दिम शेख,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गड परसराम टिकले,सरपंच टेमली निकाबई थाट,दीपक हलामी,परमेश लोहंबरे,श्रावण मातलाम, शिषुला नरोटे,भारत नरोटे सियाराम हलामी, धनिराम हिडामी,अमित दास,रा काटेंगे,भारत नुरुटी, सुदाराम साहारे,जुगेल नुरूटी,रमेश नरोटे,संतोष नरोटे, जगतराम नरोटे, रवि नंदेश्वर, कांतारामजी जमकातम, तावडे सर, राजेश नैताम, सर्व मान्यावर व शिक्षकवृंद तथा विद्यार्थी बांधव ……
✍🏻प्रतिनिधी: प्रविण डी कोवाची
9637165828
Discussion about this post