जागोजागी मटक्याचे काउंटर भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेच्या वतीने आंदोलन करणार
प्रवीण इंगळे — उमरखेड
तालुका प्रतिनिधी मो, 7798767266
उमरखेड.: तालुक्यात विडुळ सर्कलमध्ये विडुळ गावात जागोजागी मटक्याचे काउंटर आहेत. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे
या मटक्यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत व होत आहे या गावातील मजूर दिवसभर काम करतात रोज मजुरी करतात सकाळ संध्याकाळ मटका खेळतात मटक्यात पैसे हरून घरी जातात काही मजूर हफ्ताभर काम करतात बाजारच्या दिवशी हप्ताभर कामाला पैसा मटक्यात घालतात व खाली पिशवी घेऊन घरी जातात ठाणेदार व पोलीस प्रशासन या विडुळ सर्कल कडे खरुस,चालगनी व तसेच ब्राह्मणगाव या गावामध्ये मटक्याचा सुळसुळाट झालेला आहे.
विडुळ सर्कलमधील जनता त्रस्त झालेली आहे. शासन याकडे लक्ष देतील का असा प्रश्न जनतेपुढे आहे तात्काळ हा धंदा बंद करण्यात यावा. अन्यथा भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली या संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उमरखेड येथे आंदोलन करणार असा इशारा भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष राजेश खंदारे यांनी दिला आहे.
Discussion about this post