- डॉ.बा.आ.विद्यापीठ संघाने रचला इतिहास
सोयगाव
भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महिला बुद्धिबळ संघाने सातव्या फेरीत विजय पटकावला. पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरीत विद्यापीठ संघाने इतिहास घडविला.
या संघात संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री पाटील, संस्कृती वानखडे, तनिषा बोरामनीकर, सानिया तडवी, साचल बिहाणी, संघमित्रा यांनी पहिल्या फेरीत डॉ. सुभाष विद्यापीठ जुनागड (गुजरात) संघाविरुद्ध ४०० गुणाने विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत गुजरात टेक्नॉलॉजी विद्यापीठाविरुद्ध ४-० ने विजय मिळविला. तिसऱ्या फेरीत बलाढ्य असलेल्या भारती विद्यापीठ, पुणे संघातील खेळाडू आकांक्षा हगवणे हिला भाग्यश्री पाटील हिने बरोबरीत रोखत आपल्या संघाला ०.५ गुण मिळवून दिले. सानिया तडवी, संस्कृती वानखडे आणि तनिषा बोरामनीकर यांनी विजय संपादन करून ३.५-०.५ गुण मिळवत स्पर्धेत आघाडी मिळवून दिली. चौथ्या फेरीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे विरुद्ध ३.५-०.५ विजय मिळविला. बलाढ्य युनिव्हर्सिटी ऑफिस मुंबई विरुद्ध ३.५-०.५ विजय मिळवत स्पर्धेच्या विजेतेपदावर पकड मजबूत केली. सहाव्या फेरीत महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ अॅण्ड सायन्स नाशिक विरुद्ध ३.५-०.५ ने विजय मिळवत औपचारिकता शिल्लक ठेवली. सातव्या व अंतिम फेरीत वीर नर्मदा साऊथ गुजरात युनिव्हर्सिटी संघाला सरळ ४-० ने धूळ चारत विजेतेपदावर नाव कोरले.
विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचे अजिंठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रंगनाथ नाना काळे सचिव प्रकाश दादा काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पवार उपप्राचार्य रावसाहेब बारोटे प्रोफेसर डॉ दिलीप बिरुटे प्रोफेसर पंडित नलावडे डॉ साईराज तडवी डॉ निलेश गावडे डॉ सैराज तडवी डॉ सुशील जावळे डॉ शत्रुघन भोरे व क्रीडा विभाग प्रमुख निलेश गाडेकर आदींनी अभिनंदन केले.
Discussion about this post