प्रतिनिधी:- अक्षय कांबळे
बारामती तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.अभ्यास करीत नाही याचा राग मनात धरून बापानेच पोटच्या मुलाचा गळा दाबून खून मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे .
14 जानेवारी ला दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास पियूष वय 9 वर्ष घरात असताना त्याचे वडील विजय भंडलकर त्यांनी त्याला अभ्यासाविषयी ओरडा केला . त्यानंतर तू सारखं बाहेर खेळतोस .तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस असे म्हणून त्यांनी त्याला रागाच्या भारत भिंतीवर आपटले .नंतर त्याचा गळा दाबून खून केला
या प्रकरणी पोलिसांनी विजय गणेश भंडलकर .शालन विजय भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर ( सर्व रा. होळ . ता.बारामती.जिल्हा.पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .
Discussion about this post