………………………. लोहा कंधार प्रतिनिधी….श्री योगीराज गजानन महाराज यांच्या 147 व्या प्रकट दिनानिमित्त कंधार येथील श्री गजानन प्रस्तुती ग्रह व बाल रुग्णालय येथे तसेच बाळ रुग्णालयाच्या अकराव्या वर्धापन दिना निमित्त महापूजा व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री योगीराज गजानन महाराज प्रकट दिन कंधार येथे साजरा करण्यात आला.तसेच रुग्णालयाचे संचालक डॉ.गजानन आंबेकर व त्यांच्या पत्नी वसुधा आंबेकर यांनी महापूजा झाल्याच्या नंतर सर्व भक्तजनांना शुभेच्छा देऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली . तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Discussion about this post