प्रतिनिधी:- भरत पगारे
येथील सोयगाव – शेंदुर्णी बायपास रस्त्यावरील मैदानावर प.पु.सदगुरू वें.नाईक दादा गुरुजी यांच्या प्रेरणेने नाशिक येथील सुप्रसिद्ध शिवकथाकार ह.भ.प.अनिल महाराज तुपे यांच्या अमृत वाणीतून श्री शिवपुराण भावकथा श्रवणाचा कार्यक्रम घेण्यात आला..
या वेळी शिव महापुरान कथा एकण्यापूर्वी भाविकांनी दर्शन घेतलेच पाहिजे,दर्शन न घेता श्रावण केल्यास दरिद्रता येत असल्याचे प्रतिपादन शिवकथाकार ह.भ.प. अनिल महाराज तुपे यांनी केले. तसेच देव दर्शन दोन्ही हाताने घेतल्यास पुण्य संपादन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या श्री शिवपुराण कथा महोत्सवाचे सोयगाव येथील बायपास रोडवरील अनंत जगताप यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेले असून परीसरातील हजारो भाविक या श्रवणाचा लाभ घेत आहे.
त्यामुळे भाविकामध्ये भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडावा यासाठी ह. भ. प. मधुकर आहिरे गुरुजी, विजय आहीरे, जगन्नाथ दुतोंडे, शिवाजी चौधरी, प्रल्हाद चौधरी, पंडित काकडे, वामन जावळे, त्रबक चौधरी, लखनसिंग परदेशी, शांताराम सोनवणे, शांताराम चौधरी, विनोद सोहनी, संतोष सोहनी, शशिकांत काळे, गोविंद आहिरें, प्रमोद पाटील, किशोर पाटील, शांताराम ताडे, संजय तायडे, दिलीप चौधरी, युवराज देसले, वसंत मंडवे, सारंग बागले, जितेंद्र झवर, आकाश कायस्थ, प्रभाकर कायस्थ यांच्यासह प. पु. नाईक दादा गुरुजी भक्त मंडळ व ग्रामस्थ परीश्रम घेतले.
Discussion about this post