प्रतिनिधी :- राजकुमार शिंदे
कळंब – कसबे तडवळे येथील २२,२३ फेब्रुवारी १९४१ रोजी झालेल्या महार–मांग वतनदार परिषदेच्या ८४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत संविधान अमृत महोत्सवी वर्षामध्ये सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या एकसष्टी व प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामीण व पारंपारिक कलावंतांची परिषद दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी विरंगुळा केंद्र,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसर,कळंब येथे संपन्न होत आहे.
या परिषदेमध्ये विविध प्रकारच्या ग्रामीण व पारंपारिक कलेचे ग्रुप सादरीकरण होत असून कलावंतांच्या समस्यावर ठराव पारित करून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सहभागी झालेल्या कलावंतास नायब तहसीलदार श्रीकिशन सांगळे,बालविकास प्रकल्प अधिकारी ताई बोराडे,सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ (अण्णा) तोडकर,भैरवनाथ अध्यापक विद्यालय प्राचार्य सतीश मातने,कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे,सा.साक्षी पावनज्योत कायदेशीर सल्लागार विधीज्ञ शकुंतला फाटक,मराठवाडा रेडिओच्या निवेदिका सविता मालूरे,गझलकार शेखर गिरी, माजी नगरसेवक सुनील गायकवाड,शिव-भीम शाहीर बंडू खराटे,पत्रकार संभाजी गिड्डे, संस्था अध्यक्ष सुभाष घोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या परिषदेत सर्व ग्रामीण व पारंपारिक कलावंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्था सचिव प्रा.अविनाश घोडके यांनी केले आहे.
Discussion about this post