ग्रामपंचायत सचिवा कडे तक्रार करुन न्यायची मागणी
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील नांदगांव ग्रामपंचायत येथील सरपंच यांनी पुर्व सुचना न देता नांदगांव गावातील रहवासी देवचंद चव्हान यांचे गाई,बकऱ्यांचे शेतखंताचे खात फेकले. असा आरोप देवचंद चव्हान यांनी करीत ग्राम सचिव विना बावनकुळे यांचा कडे तक्रार करुन तात्काळ योग्य कारवाई करुन न्यायची मागणी केली आहे.
देवचंद्र बागाजी चव्हान हे नांदगाव येथील रहिवासी असुन त्यांचा कडे गाई, बकरी आणि इतर जनावरे आहे. त्यांचा भरोश्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाण चालतो, गावातली एका बाजूला खाली असलेल्या जागेवर अनेक गावकऱ्यांच्या गाई, बकरी आणि इतर जनावरे शेतखंताचे खात त्या जागी जमा करतात. परंतु नांदगांव ग्रामपंचायत सरपंच मिलिंद देशभ्रतार त्यांनी आपल्या पदाच्या दुरुपयोग करून देवचंद चव्हान यांचा शेतखतांचे जमा असलेले खात पुर्व सुचना न देता फेकुन दिले, व गावातील बाकी लोकांचे खात तसेच ठेवले व सरपंच मिलिंद देशभ्रतार यांनी उलट देवचंद चव्हान यांचा कुटुंबावर अन्याय करून शिवागाळी करत लाकडी डंडा व ईतर साहित्य घेऊन मारण्याचे धमक्या दिल्या असा आरोप देवचंद चव्हान यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे .देवचंद चव्हान यांनी ग्रामपंचायत सचिव विना बावनकुळे यांचा कडे तक्रार करुन सरपंचावर कारवाई करुन कुटुंबाला न्याय मिळुन देण्याची मागणी केली आहे.
नांदगांव ग्रामपंचायत सचिव विना बावनकुळे यांना सदर प्रकरणाची विचारणा केली असता त्यांनी देवचंद चव्हान यांनी सरपंच विरुद्ध तक्रार केल्याचे सांगितले . मासिक सभेत विषय ठेऊन मोका चौकशी करुन पारशिवनी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना अहवाल सादर करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल,असे सचिव विना बावनकुळे यांनी म्हटले आहे .
या संदर्भात नांदगांव ग्रामपंचायत सरपंच मिलिंद देशभ्रतार यांना दुरध्वनी च्या माध्यमातुन विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार देवचंद चव्हान यांना दोन – तीन वेळा नोटिस दिले,तक्रदाराची स्वाक्षरी आहे असे सरपंचानी सांगितले , आपण काही खात नाही फेकले , रोड वरील कचरा साफ केले.ग्रामपंचायतने या संदर्भात ठाराव घेतला काय,असा प्रश्न सरपंच मिलिंद देशभ्रतार यांना केला असता त्यांनी घेतला असे सांगितले.यावेळी पत्रकारांनी सरपंच मिलिंद देशभ्रतार यांना तक्रारदाराला दिलेल्या नोटीस ची काॅफी व्हाट्सएप वर पाठवायला म्हटले असता, त्यांनी पाठवतो असे म्हटले होते. परंतु सरपंचाने कुठलेही नोटीस पत्रकार पाठविले नाही.
Discussion about this post