शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटना ग्रस्त झाला ही अत्यंत वेदनादायी अन मनाला संताप आणणारी घटना आहे. महाराजांचा पुतळा उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून आज दि.29 ऑगस्ट रोजी राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर मूक आंदोलन करण्यात आले आहे.
याच पार्शवभूमी वर शहापूर तालुक्यातील शिवतीर्थ येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मूक आंदोलन करण्यात आले. शहापूर तालुका आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत (भाऊ)गोंधळे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस डी. के. विशे सर,महिला ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ. कल्पना तारमळे, जिल्हा अल्प संख्यांक अध्यक्ष उस्मान शेख,तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे, युवक अध्यक्ष दिनेश चंदे, महिला तालुका अध्यक्ष सौ सविता मोरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते..यावेळी सदर पुतळा कोसळणे घटनेच्या अनुषंगाने दोषींवर तात्काळ कायदेशीर रित्या कारवाई करण्यात यावी असं निवेदन तहसील कार्यालय कर्मचारी यांना आमदार दरोडा यांच्या कडून देण्यात आले.
कालच्या एका जनसन्मान यात्रेमध्ये अजितदादा यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली आहे..
“मी महाराष्ट्रातल्या १३ कोटी जनतेची माफी मागतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आपले सर्वांचे दैवत आहेत, आणि त्यांच्या पुतळ्याची झालेली घटना ही धक्का देणारी आहे. – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…
Discussion about this post