इंदापूर तालुका प्रतिनिधी – संतोष मिंड
इंदापूर येथे आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या वतीने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या रक्षाबंधन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तात्रेय मामा भरणे यांच्या उपस्थितीत व सामाजिक कार्यकर्ते व गरजू लोकांना मदत करणारे व्यक्तिमत्व पैलवान माननीय श्री विजय मामा शिद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. इंदापूरचे विकासरत्न आणि दिनदुबळ्यांचा आधार आणि वंचितांना कायम मदत करणारे अशी ओळख असणारे आमदार दत्तात्रय भरणे यांना हजारो महिलांनी राखी बांधून औक्षण केले. या हजारो महिलांचे प्रेम आणि आपलेपणा पाहून आमदार दत्तात्रय भरणे हे भारावून गेले. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ट्रॉफी देऊन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकासाच्या आणि मदतीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनाही ट्रॉफी देऊन ग्रुपच्या वतीने सन्मानित केले.
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महादेव लोंढे यांनी आपल्या मनोगतात ग्रुपच्या माध्यमातून काय काय कामे केली जातात, तळागाळातील गरजू महिलांना कसा लाभ मिळेल आणि कशी मदत मिळेल यासाठी ग्रुप हा तत्पर कार्यरत असतो असे सांगितले जेणेकरून तालुक्यातील गरजू एकही महिला कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी ग्रुप हा तत्परतेने काम करत असतो असे सांगितले.
या कार्यक्रमात या ग्रुपचे मार्गदर्शक भीमराव शिंदे यांनी उपस्थित महिला उन्हात बसून राहिल्यामुळे आभार मानले व हा ग्रुप कायम तुमच्या सोबत पाठीशी राहील तुम्ही आमच्या सोबत पाठीशी राहा असे मत व्यक्त केले.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात संबोधित करताना एक छोटासा ग्रुप एवढ्या मोठ्या संख्येने महिला एकत्र करू शकतो नवल वाटते ग्रुपच्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे यापुढे मामा कायम तुमच्या पाठीशी राहील असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले भवानीनगरचे प्रगतशील बागायतदार आणि उद्योजक माननीय काळे साहेब यांना या ग्रुपच्या महिलांचे कौतुक वाटले व लगेच त्यांनी फोन करून 1000 साड्या मागवून आलेल्या सर्व महिलांना साड्या देण्यात आल्या या ग्रुपच्या वतीने दानशूर माननीय काळे साहेबांचा सन्मान करण्यात आला व शेवटी महिलांसाठी श्रावणी व एकादशी असल्याने खिचडी वाटप व केळी वाटप करण्यात आले.
Discussion about this post