शाळा, मंदिर, अंगणवाडी परिसरात व रस्त्यावर घाण करणाऱ्यावर व जनावरे बांधणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. रिठा येथील ग्रामसभेत ठराव मंजूर. नांदेड जिल्हा प्रतिनिधी दि. 30/08/2024 रोजी रिठा येथे ग्रामसभेत गावातील नागरिकांनी गावातील सार्वजनिक रस्त्यावरील, अतिक्रमणे वाढल्यामुळे ये जा करण्यासाठी व मोठी वाहने वाहतूक करण्यासाठी
व सार्वजनिक कामे करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे अतिक्रमणे तात्काळ काढावे व सार्वजनिक रस्त्यावर, नालीत, शाळा, मंदिर अंगणवाडी परिसरात कचरा टाकून घाण करणाऱ्यावर व जनावरे, शेळ्या, मेंढ्या बांधणाऱ्यावर कठोर कारवाई करावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.यावेळी गावातील नागरिकांनी अनुमोदन दिल्यानंतर ग्रामसभा संपन्न झाली.
Discussion about this post